महानगरपालिकेची ‘टू पाईंट ओ’मध्ये निवड
कर्नाटकातून केवळ बेळगावचा योजनेमध्ये समावेश : अधिकाऱ्यांचे कौतुक
बेळगाव : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरातील विविध विकासकामे केली गेली. आता या स्मार्ट सिटीची मुदत जुलै 2024 ला संपणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने शहरातील कचरा निर्मूलनासाठी ‘टू पॉईंट ओ’ या योजनेंतर्गत देशातील 18 शहरांकडून आराखडे मागविण्यात आले होते. त्यामध्ये बेळगाव महानगरपालिकेने आपला संपूर्ण आराखडा दाखल केला होता. त्याला यश आले असून बेळगावची ‘टू पॉईंट ओ’मध्ये निवड झाली आहे. यामुळे आता कचरा निर्मूलनासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी मिळणार आहे. स्मार्ट सिटी ‘टू पॉईंट ओ’ या केंद्र सरकारच्या योजनेमध्ये बेळगाव महानगरपालिकेची निवड झाली आहे. यामुळे बेळगाववासियांना मोठा दिलासा मिळाला असून दरवर्षी 135 कोटी रुपये कचरा निर्मूलनाच्या विविध प्रकल्पांसाठी मिळणार आहेत. सलग पाच वर्षे ही रक्कम मिळणार असून महानगरपालिकेचे व अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. महानगरपालिकेतील पर्यावरण विभागाचे साहाय्यक अभियंते हणमंत कलादगी यांनी हा आराखडा तयार करून दिल्लीला पाठविला होता. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करून कार्यशाळेलाही महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या कार्यशाळेमध्ये बेळगाव मनपाच्यावतीने कचरा निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची मांडणी त्या ठिकाणी करण्यात आली. कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून तो इतर प्रकल्पांसाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला खर्च करण्याऐवजी बचत होत असल्याची माहिती कार्यशाळेमध्ये देण्यात आली. कचऱ्यापासून सीएनजी गॅस उत्पादन करण्यात येत आहे. त्याबाबतचाही प्रकल्प त्याठिकाणी मांडण्यात आला होता. बेळगाव मनपाच्यावतीने या विविध प्रकल्पाची माहिती त्या ठिकाणी दिल्यानंतर कचरा निर्मूलनासाठी आता ‘टू पॉईंट ओ’ योजनेमध्ये शहराला सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्या निधीतून वेस्ट बायोमेडिकल प्रकल्प राबविण्यास मदत होणार असल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशातील एकूण 18 मनपांची निवड
देशातील एकूण 18 महानगरपालिकांची स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘टू पॉईंट ओ’मध्ये निवड केली गेली आहे. कर्नाटक राज्यातून केवळ बेळगाव महानगरपालिकेची निवड करण्यात आल्याने बेळगाव शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडीबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
Home महत्वाची बातमी महानगरपालिकेची ‘टू पाईंट ओ’मध्ये निवड
महानगरपालिकेची ‘टू पाईंट ओ’मध्ये निवड
कर्नाटकातून केवळ बेळगावचा योजनेमध्ये समावेश : अधिकाऱ्यांचे कौतुक बेळगाव : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरातील विविध विकासकामे केली गेली. आता या स्मार्ट सिटीची मुदत जुलै 2024 ला संपणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्यावतीने शहरातील कचरा निर्मूलनासाठी ‘टू पॉईंट ओ’ या योजनेंतर्गत देशातील 18 शहरांकडून आराखडे मागविण्यात आले होते. त्यामध्ये बेळगाव महानगरपालिकेने आपला संपूर्ण […]