चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला ! भरजरी फाडुन शेला, चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला

चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला

चिंधी बांधिते द्रौपदी,

हरिच्या बोटाला !

भरजरी फाडुन शेला,

चिंधी बांधिते द्रौपदी

हरिच्या बोटाला

 

बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक

कर पाठीवर पडला अपसुक

प्रसन्न माधव झाला, 
चिंधी बांधिते द्रौपदी,

हरिच्या बोटाला !

 

म्हणे खरी तू माझी भगिनी

भाऊ तुझा मी दृपद नंदिनी

साद घालिता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला,

चिंधी बांधिते द्रौपदी

हरिच्या बोटाला !

 

प्रसंग कैसा येईल मजवर

पाठीस असशी तू परमेश्वर

बोले कृष्णा दाटून गहिवर

पूर लोचना आला,
चिंधी बांधिते द्रौपदी,

हरिच्या बोटाला !

 

गीत : ग. दि. माडगूळकर  

संगीत : सुधीर फडके

स्वर : आशा भोसले

चित्रपट : झेप (१९७१)