मिरच्या खाणारे मासे

जलाशय किंवा तलावात पाळलेल्या किंवा अशा स्थानी नैसर्गिकरित्या असणाऱ्या माशांना खायला घालण्याची सवय अनेक पर्यटकांना आहे. अशा प्रकारे त्यांना खायला घालू नये, अशी सूचना दिलेली असतानाही असे प्रकार होतात. तथापि, चीनमध्ये एक असा जलाशय आहे, की त्यातील माशांना प्रतिदिन 5 हजार किलो वजनाची मिर्ची खायला घातली जाते. माशांनी मिर्ची खाल्ली तर त्यांची वाढ अधिक जोमाने […]

मिरच्या खाणारे मासे

जलाशय किंवा तलावात पाळलेल्या किंवा अशा स्थानी नैसर्गिकरित्या असणाऱ्या माशांना खायला घालण्याची सवय अनेक पर्यटकांना आहे. अशा प्रकारे त्यांना खायला घालू नये, अशी सूचना दिलेली असतानाही असे प्रकार होतात. तथापि, चीनमध्ये एक असा जलाशय आहे, की त्यातील माशांना प्रतिदिन 5 हजार किलो वजनाची मिर्ची खायला घातली जाते. माशांनी मिर्ची खाल्ली तर त्यांची वाढ अधिक जोमाने होते. अशा माशांची त्वचाही अधिक सतेज असते आणि त्यांची चवही अधिक वाढते, असे आढळल्याचे चीनी लोकांचे म्हणणे आहे.
चीनच्या हुनान प्रांतातील चांगशा येथे हा जलाशय आहे. त्याचे क्षेत्रफळ 10 एकर आहे. या जलाशयात अनेक मासे पाळले जातात. या माशांना प्रतिदिन वेगवेगळ्या प्रकारची ताजी लाल मिर्ची खायला घातली जाते. हा जलाशय माशांना पाळण्यासाठीच काही लोकांनी संयुक्तरित्या निर्माण केला आहे. या जलाशयात 2 हजारांहून अधिक मासे आहेत. ते प्रतिदिन प्रत्येकी दोन ते तीन किलो लाल मिरच्या खातात. त्यामुळे भरपूर प्रमाणात मिरच्या त्यांच्यासाठी टाकल्या जातात. मिर्च्या खाल्ल्याने या माशांच्या मांसाला एक वेगळीच आणि चांगली चव येते. परिणामी या माशांची बाजारातील किंमतही वाढते. 5 हजार किलो मिरची आणण्यासाठी जो खर्च करावा लागतो, त्यापेक्षा या माशांच्या विक्रीतून कितीतरी अधिक रक्कम त्यांना पाळणाऱ्या लोकांना मिळते. त्यामुळे त्यांनी हा उपक्रम चालविला आहे. माशांनाही मिरच्या आवडतात. तसेच त्यांच्यावर मिरच्या खाल्ल्याने कोणताही विपरीत परिणाम होत नाही. विशिष्ट प्रकारच्या लाल मिरच्या या माशांना अधिक आवडतात, असेही त्यांना पाळणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. माशांना मिरचीचा तिखटपणा जाणवत नाही. कारण, मासे चवीनुसार अन्नाची निवड करत नाहीत. तर हुंगून निवड करतात, असे अनेक मासे तज्ञांचे म्हणणे आहे.