Satara : साताऱ्यात गरम पाण्याने भाजल्याने मुलाचा मृत्यू!

                         सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू  सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ येथे खेळताना बाथरूममध्ये गरम पाण्याच्या बादलीला धक्का लागून पाणी अंगावर पडून देवांश अमोल शिंदे (वय ५, रा. मल्हारपेठ सातारा) याचा भाजून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २६ ऑक्टोबर […]

Satara : साताऱ्यात गरम पाण्याने भाजल्याने मुलाचा मृत्यू!

                         सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू 

सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ येथे खेळताना बाथरूममध्ये गरम पाण्याच्या बादलीला धक्का लागून पाणी अंगावर पडून देवांश अमोल शिंदे (वय ५, रा. मल्हारपेठ सातारा) याचा भाजून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता देवांश हा घरात खेळत असताना बाथरूममध्ये खेळत गेला. यावेळी अंघोळीसाठी गरम करण्यात आलेल्या बादलीला त्याचा धक्का लागला. यावेळी गरम पाणी त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला.
घरच्यांनी तातडीने त्याला सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. दि. २७ ऑक्टोबर रोजी त्याला ससून रुग्णालय, पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ससून उपचारादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार व्ही. के. बडे यांनी दिली आहे.