सिक्कीममध्ये दोन जागांवर लढणार मुख्यमंत्री तमांग

पत्नी देखील लढविणार निवडणूक वृत्तसंस्था/ गंगटोक लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीचीही तयारी होत आहे. चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या 4 राज्यांमध्ये सिक्कीमचा समावेश आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग हे दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार आहेत. तर त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय या नामची-सिंघीथांग विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतील. या मतदारसंघात कृष्णा कुमारी यांच्यासमोर विरोधी पक्ष […]

सिक्कीममध्ये दोन जागांवर लढणार मुख्यमंत्री तमांग

पत्नी देखील लढविणार निवडणूक
वृत्तसंस्था/ गंगटोक
लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीचीही तयारी होत आहे. चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या 4 राज्यांमध्ये सिक्कीमचा समावेश आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग हे दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविणार आहेत.
तर त्यांच्या पत्नी कृष्णा कुमारी राय या नामची-सिंघीथांग विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतील. या मतदारसंघात कृष्णा कुमारी यांच्यासमोर विरोधी पक्ष एसडीएफचे अध्यक्ष पवन कुमार चामलिंगचे आव्हान असणार आहे. राज्यात सत्तारुढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने सोमवारी 32 विधानसभा मतदारसंघ आणि एकमेव लोकसभा मतदारसंघासाठी स्वत:च्या उमेदवारांची घोषणा केली आहे.  पक्षाकडून विद्यमान खासदार इंद्रा हैंग सुब्बा यांनाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तमांग हे सोरेंग-चाकुंग आणि रेनॉक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने 9 मंत्र्यांना उमेदवारी दिली आहे. तर दोन मंत्र्यांना उमेदवारी नाकारली आहे.