पुण्यातील घायवळ प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चा झाली आणि गुंड सचिन व निलेश घायवळ यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्याचे प्रकरणाचा प्रश्न समोर आला.
ALSO READ: पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल
त्यांच्यावर कोणताही गुन्हा अद्याप नोंदवलेला नाही. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार महेश सावंत, विजय शिवतारे आणि रोहित पवार यांनी पुण्यातील अलीकडच्या गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला.
ALSO READ: राज्यातील शाळा कॉलेज परिसरात गुटका विक्री रोखण्यासाठी मोका लागू करण्याची राज्य सरकारची घोषणा
या वर फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, माहिती तंत्रज्ञान कायदा , टेलिकम्युनिकेशन कायदा, पासपोर्ट अॅक्ट ,शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) या विविध कायद्यांअंतर्गत कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात घायवळ बंधूंवर गुन्हे नोंदवले आहेत. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नाही, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले
ALSO READ: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचे निदर्शने, विधानभवन परिसरात जोरदार निदर्शने
सराईत गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी डोजिअर फॉर्म भरून घेणे, तसेच कोंबिंग ऑपरेशन राबविणे यांसारख्या उपाय योजना सक्रिय आहे.
Edited By – Priya Dixit
