महिला सुरक्षेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य, म्हणाले आरोपींना फाशी देऊ
सध्या देशात महिलांवर अत्याचाराचे प्रमाणात वाढ होत आहे. महिलांवर अत्याचार कारण्यांना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. नागपुरात लाडकी बहीण योजनेची परिषद आयोजित केली गेली. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. या वेळी हजारो लाडक्या भगिनी उपस्थित होत्या. लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना संबोधित केले.
ते म्हणाले, राज्यात लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. तर महिलांच्या सुरक्षतेची काळजी घेण्याचे सुनिश्चित करू. महिलां आणि मुलींवर वर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. या साठी न्यायालयात जाऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू.दोषींना माफी मिळणार नाही.
राज्य शासनाने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळला. बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. आमच्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बदलापुरात जे काही घडलं त्याच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गिरीश महाजन, अदिती तटकरे, धर्मराव बाबा आत्राम हे उपस्थित होते.
Edited By – Priya Dixit