मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा

आज आषाढी एकादशी निमित्ते पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल -रखुमाईची महापूजा केली. यंदा पूजेचा मान मुख्यमंत्र्यांसह वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन रहिवासी शेतकरी बाळू शंकर अहिरे (55) आणि त्यांची पत्नी …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा

social media

आज आषाढी एकादशी निमित्ते पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल -रखुमाईची महापूजा केली. यंदा पूजेचा मान मुख्यमंत्र्यांसह वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन रहिवासी शेतकरी बाळू शंकर अहिरे (55) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे(50) यांना मिळाला.अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहे. 

#LIVE | श्री क्षेत्र पंढरपूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा https://t.co/4tPsJyd2Au
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2024

 

या वेळी मुख्यमंत्र्यांनी  विठ्ठलाकडे राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाचे कष्ट दुःख दूर कर, त्याला सुजलाम सुफलाम ठेव, शेतकरी, कष्टकरी, युवक,ज्येष्ठ यांच्या जीवनात सुख शांती समाधान येऊ दे.अशी मागणी केली. 

मला सलग तिसऱ्या वर्षी विठ्ठलाची महापूजा करण्याचा लाभ मिळाला हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. असे ते म्हणाले.या वर्षी मागील वर्षापेक्षा जास्त प्रमाणात वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. 

पंढरपुरात देखील तिरुपती बालाजी प्रमाणे दर्शन मंडप आणि टोकन पद्धत सुरु करणार असून त्यासाठी राज्य सरकार 103 कोटी देण्याची माहिती मौख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे वारकऱ्यांना लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. या साठी त्यांच्याकडून दर्शनासाठी 1 रुपयाही मंदिर समिती कडून घेतला जाणार नाही. 

विकास कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. 

 

Edited by – Priya Dixit

Go to Source