बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात कोणलाही सोडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा म्हणाले
बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपीना अटक केली असून अद्याप तीन आरोपी फरार आहे. या प्रकरणात आज मुख्यमंत्री यांनी पुनरुच्चार करत म्हणाले, की गुन्हेगारांना शिक्षा केली जाईल.कोणालाही सोडणार नाही.
बाबा सिद्दीकी यांची निर्मल नगर येथे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
या हल्ल्यात त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा खुलासा करत सांगितले की, त्यांच्या हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वीच रचला गेला होता, आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घरी अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते. मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 15 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.
आरोपींनी चॅटिंग आणि कॉल करण्यासाठी सोशल मीडिया ॲपचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटिंग शिकले होते. मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
Edited By – Priya Dixit