मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात ‘स्टार’ प्रचारक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक ठरले आहेत. भाजपने एकूण 23 नेत्यांची यादी महाराष्ट्राकरीता जाहीर केली असून त्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव 7 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचे नाव सर्वात शेवटी म्हणजेच 23 क्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. न•ा, राजनाथ […]

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात ‘स्टार’ प्रचारक

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारक ठरले आहेत. भाजपने एकूण 23 नेत्यांची यादी महाराष्ट्राकरीता जाहीर केली असून त्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव 7 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अशोक चव्हाण यांचे नाव सर्वात शेवटी म्हणजेच 23 क्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. न•ा, राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, डॉ. प्रमोद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. गोव्यात दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी डॉ. सावंत हे अधूनमधून महाराष्ट्रात प्रचाराला जातील. गोव्यातील प्रचार झाल्यानंतर ते तेलंगण तसेच महाराष्ट्रातील उर्वरित मतदारसंघांमध्ये प्रचाराला जातील.