चिकन मोमोज रेसिपी

साहित्य- मैदा- १०० ग्रॅम तेल-एक टीस्पून मीठ चवीनुसार चिकन- २०० ग्रॅम मिरे पूड – एक टीस्पून कोथिंबीर- अर्धा कप कांद्याची पात -दोन चमचे

चिकन मोमोज रेसिपी

साहित्य-

मैदा- १०० ग्रॅम

तेल-एक टीस्पून

मीठ चवीनुसार

चिकन- २०० ग्रॅम 

मिरे पूड – एक टीस्पून

कोथिंबीर- अर्धा कप

कांद्याची पात -दोन चमचे 

कांदा- एक बारीक चिरलेला 

आले लसूण पेस्ट- एक टीस्पून

पाणी 

ALSO READ: लेमन चिकन रेसिपी

कृती- 

सर्वात आधी मैदा घेऊन तो चाळून घ्यावा. आता त्यामध्ये मीठ घालावे आणि दोन चमचे तेल घाला आणि चांगले मिक्स करा. ते मिक्स झाल्यावर, पिठात थोडे पाणी घाला आणि मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर ते कापडाने झाकून टाका. आता चिकन घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावे व त्याचे लहान तुकडे करा. मिक्सर ग्राइंडरमध्ये चिकन बारीक केले की ते एका भांड्यात काढा. आता चिकनमध्ये मिरेपूड, मीठ, कांद्याची पात, कांदा, आलेलसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. आता मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. गोळे तयार झाल्यावर पुरीएवढ्या मोठे लाटून घ्या. आता पुरीमध्ये तयार चिकन ठेवा आणि एका बाजूने घडी करा आणि त्याला मोमोचा आकार द्या. सर्व मोमोज तयार झाल्यावर वाफेवर शिजवून घ्या. मोमोज कमीतकमी १० मिनिटे वाफवून घ्यायचे आहे. १० मिनिटांनी गॅस बंद करा आणि मोमोजवरून झाकण काढा. तयार मोमोज प्लेटमध्ये काढून घ्या. तर चला तयार चिकन मोमोज रेसिपी, चटणी, गोड चटणी सोबत नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: मसालेदार चिकन कॉर्न सूप

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: चिकन साटे रेसिपी