चिकन फ्राईड राइस रेसिपी

साहित्य- वाफवलेला बासमती तांदूळ – चार कप चिरलेली चिकन – दोन कप अंडी – चार व्हेजिटेबल तेल – तीन टेस्पून चिरलेला कांदा- एक चमचा सिमला मिरची – एक चमचा फरसबी – 1 कप सोया सॉस – ⅓ कप

चिकन फ्राईड राइस रेसिपी

साहित्य-

वाफवलेला बासमती तांदूळ – चार कप

चिरलेली चिकन – दोन कप

अंडी – चार  

व्हेजिटेबल तेल – तीन टेस्पून

चिरलेला कांदा- एक चमचा  

सिमला मिरची – एक चमचा 

फरसबी – 1 कप

सोया सॉस – ⅓ कप

चिली-गार्लिक सॉस – दोन चमचे

 

कृती-

सर्वात पहिले पॅनमध्ये तेल गरम करून अंडी घालावी.आत 2 मिनिटे स्क्रॅम्बल होईपर्यंत हळूहळू ढवळत शिजवा.आता कढईत तेल पुन्हा गरम करावे. नंतर कांदा, सिमला मिरची आणि फरसबी घालून 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यावे. आता त्यात चिकन घालून चांगले परतवून घ्या. आता त्यात भात, सोया सॉस आणि चिली-गार्लिक सॉस घालून  3 ते 4 मिनिटे शिजवा. सर्वकाही चांगले मिक्स करा आणि स्क्रॅम्बल्ड अंडी घालावी. आता कोथिंबीरीने गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली चिकन फ्राईड राईस रेसीपी,  गरम नकीच सर्व्ह करा.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik