चिकन कटलेट रेसिपी

चिकन मिन्स – 500 ग्रॅम आले लसूण पेस्ट – एक टीस्पून ताज्या हिरव्या मिरच्या – दोन चवीनुसार मीठ तिखट -1 टेबलस्पून जिरे पूड – अर्धा टीस्पून

चिकन कटलेट रेसिपी

चिकन मिन्स – 500 ग्रॅम

आले लसूण पेस्ट – एक टीस्पून

ताज्या हिरव्या मिरच्या – दोन 

चवीनुसार मीठ  

तिखट -1 टेबलस्पून

जिरे पूड – अर्धा टीस्पून

धणेपूड – 1/4 टीस्पून

मिरे पूड – 1/4 टीस्पून

मोहरीचे तेल – अर्धा टीस्पून

कोथिंबीर – दोन चमचे 

लिंबाचा रस – अर्धा टीस्पून

ताजे ब्रेडचे तुकडे- दोन  चमचे

पीठ आणि अंडी – कोटिंगसाठी

तळण्यासाठी तेल

उकडलेला बटाटा – एक 

हिरवी मिरची – एक 

टोमॅटो – एक  

 

कृती- 

सर्वात आधी एका भांड्यात उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबाचा रस घालून सर्व मिक्स करून घ्यावे. यानंतर दुसऱ्या भांड्यात चिकनचा किस, आले-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, जिरेपूड, लिंबाचा रस, धणेपूड, मिरेपूड, मोहरीचे तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, ब्रेडचे तुकडे घालून मिक्स करावे. नंतर मिश्रणाचा थोडासा भाग घ्या आणि आपल्या आवडीनुसार आकार द्या. मैदा, नंतर अंडी आणि शेवटी ब्रेड क्रंब घालून चांगले कोट करावे असे केल्यावर पॅनमध्ये  तेल गरम करून तेलात कटलेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. आता पॅनमधून बाहेर काढावे. तर चला तयार आहे आपले चविष्ट चिकन कटलेट गरम नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik