तीर्थकुंडयेत आजपासून छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळ्याला प्रारंभ

वार्ताहर /किणये तीर्थकुंडये ग्रामस्थांच्यावतीने व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा तीर्थकुंडये यांच्यावतीने गावात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा बुधवार दि. 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारपासून या सोहळ्याला मोठ्या जल्लोषात सुऊवात करण्यात येणार आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती उभारण्यात आली आहे आणि […]

तीर्थकुंडयेत आजपासून छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण सोहळ्याला प्रारंभ

वार्ताहर /किणये
तीर्थकुंडये ग्रामस्थांच्यावतीने व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा तीर्थकुंडये यांच्यावतीने गावात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा बुधवार दि. 17 व 18 रोजी आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. बुधवारपासून या सोहळ्याला मोठ्या जल्लोषात सुऊवात करण्यात येणार आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती उभारण्यात आली आहे आणि त्याचा अनावरण सोहळा होणार असल्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आला आहे. बुधवारी सकाळी दहा वाजता विधिवत पूजेला सुऊवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सामूहिक भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुऊवार दि. 18 रोजी सकाळी 10 वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. दुपारी 1 ते 3 पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी 4 वा. खळ्यांच्या कुस्त्या होणार आहेत. रात्री 8.30 वा. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हा शिवशाहीर वेंकटेश देवगेकर व सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.