चेन्नईने कॉन्वे, रचिनला सोडले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघातील न्यूझीलंडचे क्रिकेटपटू रचिन रविंद्र आणि देवॉन कॉन्वे यांची सुटका केली आहे. आगामी आयपीएल हंगामाकरिता चेन्नईने आपल्या संघात नव्या दमाचे आक्रमक फलंदाजांना संधी देण्याचे ठरविले आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने कॉन्वेला 6.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. […]

चेन्नईने कॉन्वे, रचिनला सोडले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या होणाऱ्या क्रिकेटपटूंच्या लिलावापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघातील न्यूझीलंडचे क्रिकेटपटू रचिन रविंद्र आणि देवॉन कॉन्वे यांची सुटका केली आहे. आगामी आयपीएल हंगामाकरिता चेन्नईने आपल्या संघात नव्या दमाचे आक्रमक फलंदाजांना संधी देण्याचे ठरविले आहे.
गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जने कॉन्वेला 6.25 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. रचिन रविंद्रसाठी त्यांनी 4 कोटी रुपये मोजले होते. मात्र गेल्या आयपीएल हंगामात कॉन्वे आणि रचिन रविंद्र यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. चेन्नई संघाकडून खेळताना रचिन रविंद्रने गेल्या आयपीएल स्पर्धेत 8 डावांत 191 धावा जमविल्या होत्या तर कॉन्वेने 6 डावांत 156 धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जला गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. चेन्नईने गेल्या वर्षी या स्पर्धेत केवळ चार सामने जिंकले होते. 2022 साली कॉन्वे चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल झाला होता. 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी चेन्नईसुपर किंग्जच्या फ्रांचायझीनी नवोदित आक्रमक फलंदाजांना खरेदी करण्यावर अधिक पैसा खर्च करण्याचे ठरविले असल्याचे समजते. चेन्नई सुपर किंग्ज संघातील सुपर स्टार म्हणून ओळखला जाणारा अष्टपैलु रविंद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. तर राजस्थान रॉयल्स संघातील संजू सॅमसन चेन्नई संघात दाखल होणार असल्याचे समजते.