कल्याण बॅनर्जींकडून पुन्हा नक्कलबाजी

उपराष्ट्रपतींसोबतच पंतप्रधान मोदींची केली मिमिक्री वृत्तसंस्था/ कोलकाता तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण बॅनर्जींनी धनखड यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदींवरही मिमिक्री (नक्कल) केली. आम्ही संसदेबाहेर मिमिक्री केली, पण पंतप्रधान मोदींनी संसदेत मिमिक्री केली. त्यांनी […]

कल्याण बॅनर्जींकडून पुन्हा नक्कलबाजी

उपराष्ट्रपतींसोबतच पंतप्रधान मोदींची केली मिमिक्री
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. कल्याण बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण बॅनर्जींनी धनखड यांच्याबरोबरच पंतप्रधान मोदींवरही मिमिक्री (नक्कल) केली. आम्ही संसदेबाहेर मिमिक्री केली, पण पंतप्रधान मोदींनी संसदेत मिमिक्री केली. त्यांनी धनखड यांच्यावरही आरोप करत त्यांची तुलना शाळेतील लहान मुलांशी केली.
उपराष्ट्रपती धनखड आपल्या पदाची घटनात्मक प्रतिष्ठा नष्ट करत आहेत. कारण पदाच्या लालसेपोटी ते पंतप्रधान मोदींचा आदर करण्याऐवजी त्यांना शरण जातात, असे कल्याण बॅनर्जी सभेत म्हणाले. धनखड स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवून घेत असतानाच त्यांची जोधपूरमध्ये करोडोंची संपत्ती असल्याचा दावाही केला. तसेच कुस्तीपटू साक्षी मलिक हिची निवृत्ती आणि जाट मुलगा बजरंग पुनियाच्या पद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या मुद्यावरही हे लोक मौन का बाळगून आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या मुद्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.