‘त्या’ कार्यकर्त्यांच्या खटल्यात चार्जफ्रेम

बेळगाव : बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले होते. बेळगाव येथील म. ए. समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध धर्मवीर संभाजी चौक येथे नोंदविला. त्यानंतर निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामधील दहा कार्यकर्त्यांच्या खटल्यामध्ये चार्जफ्रेम करण्यात आले. त्यामुळे या खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. […]

‘त्या’ कार्यकर्त्यांच्या खटल्यात चार्जफ्रेम

बेळगाव : बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले होते. बेळगाव येथील म. ए. समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध धर्मवीर संभाजी चौक येथे नोंदविला. त्यानंतर निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामधील दहा कार्यकर्त्यांच्या खटल्यामध्ये चार्जफ्रेम करण्यात आले. त्यामुळे या खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. म. ए. समितीचे रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ उर्फ लोकेश राजपूत, हरिष मुतगेकर, मदन बामणे, विनायक कंग्राळकर यांसह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडेबाजार पोलिसांनी भा.दं.वि.143, 147, 148, 427, 109, 153 सहकलम 39 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तिसरे जेएमएफसी न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये गुरुवारी चार्जप्रेम झाले आहे. त्यामुळे या खटल्याचे कामकाज नियमित सुरू होणार आहे. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. महेश पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर हे काम पाहत आहेत.