मारुती गल्लीतील चप्पल दुकान आगीत खाक
लाखोंचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग
बेळगाव : मारुती गल्ली येथे चप्पल व स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दुकान मालक हिदायत शब्बीर शेख हे नेहमीप्रमाणे रात्री 8.30 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान नऊच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. आसपासच्या नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे दुसरे वाहन बोलवून घेण्यात आले. अग्निशामक दलाच्या दोन वाहनांच्या साह्याने पाण्याचा फवारा जोरदारपणे मारण्यात आल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले. घटनास्थळी खडे बाजार पोलिसांनी धाव घेऊन आग विझवण्यास प्रयत्न केला. गेल्या वर्षभरामध्ये याच दुकानांमध्ये आगीची ही दुसरी घटना असून मालक हिदायत यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शॉर्टसर्किटमुळे आगीची दुर्घटना घडली असल्याचा अंदाज अग्निशामक दलाकडून व्यक्त करण्यात येत होता.
Home महत्वाची बातमी मारुती गल्लीतील चप्पल दुकान आगीत खाक
मारुती गल्लीतील चप्पल दुकान आगीत खाक
लाखोंचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग बेळगाव : मारुती गल्ली येथे चप्पल व स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त […]
