मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त गौंडवाड येथे रामनामाचा जप

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक देवनगरी अयोध्येत सोमवारी भगवान श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त गौंडवाड येथे अभूतपूर्व उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम नामाचाही जप करण्यात आला. यानिमित्त गौंडवाड येथील मारुती मंदिरमध्ये असंख्य रामभक्तांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विविध पुजाविधी आटोपून सकाळी 8 वा. पासून ते 11 पर्यंत भजन करण्यात […]

मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त गौंडवाड येथे रामनामाचा जप

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
देवनगरी अयोध्येत सोमवारी भगवान श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त गौंडवाड येथे अभूतपूर्व उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम नामाचाही जप करण्यात आला. यानिमित्त गौंडवाड येथील मारुती मंदिरमध्ये असंख्य रामभक्तांच्या उपस्थितीत हनुमान मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विविध पुजाविधी आटोपून सकाळी 8 वा. पासून ते 11 पर्यंत भजन करण्यात आले. 11 ते 1 पर्यंत श्रीराम जय राम जय जय रामचा जप करण्यात आला. दुपारी 1 ते 2.30 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीत रामरक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले.
संध्याकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सायंकाळी 7 वा. विविध मंदिरामध्ये सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम 7.30 ते 8.30 भजन, 8.30 ते 9 पर्यंत हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो रामभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी भजनी मंडळ व वारकरी भजनी मंडळींनी भजनाची सेवा केली. नामजपामध्ये मराठी शाळेच्या शिक्षिका, शिक्षक, विद्यार्थ्यांनी व गावातील भक्तमंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दानशूर भाविक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी देवस्थान पंचकमिटीचे सदस्य दिलीप चौगुले, महेश पिंगट, हभप रुक्माणा पाटील, हभप भाऊराव पवार, वसंत पाटील, उमेश पाटील, भाऊराव पाटील, राजू पाटील, महादेव पाटील, अनिल पाटील, भैरवनाथमहिला मंडळाच्या उपाध्यक्षा, ग्रा. पं. सदस्या रोहिणी नाथबुवा, देणगीदार संतोष हेगडे, उदयकुमार हवालदारसह मान्यवर उपस्थित होते.