मंदिरी, मनमंदिरी घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष
महाशिवरात्री पर्वाने राज्यभरात शिवमय वातावरण
पणजी : महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी राज्यातील शिवमंदिरे भाविकांची अलोट गर्दी आणि हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमली. गुऊवारी पहाटेपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत महादेवाच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण गोवा शिवमय झाला होता. त्यानिमित्त सर्व मंदिरांमध्ये दुग्धाभिषेक, नामस्मरण, भजन, कीर्तन, यांसह विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हरवळे सांखळी येथील श्री ऊद्रेश्वर मंदिर, तांबडी सुर्ल येथील महादेव मंदिर, जुने गोवेतील ब्रह्मपुरी श्रीगोमंतेश्वर मंदिर, नार्वेतील श्रीसप्तकोटेश्वर, नागेशी येथील श्रीरामनाथ, आदी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी दिसून आली. त्यावेळी सर्वसामान्य भाविकांसह राज्यातील मंत्री, आमदार, उद्योजक, आदींनी आपापल्या परिसरातील मंदिरांना भेट देऊन देवदर्शन घेतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी कुटुंबियांसमवेत हरवळे येथील श्री क्षेत्र ऊद्रेश्वर मंदिरात स्वहस्ते अभिषेक केला. सर्व मंदिरांमध्ये पहाटेपासून दुग्धाभिषेक व अन्य विधींना सुऊवात झाली होती. त्यात प्रामुख्याने शिरोडा श्रीकामाक्षी श्रीरायेश्वर मंदिर, शंकरवाडी ताळगाव येथील श्रीशंकर मंदिर, सांतिनेझ येथील ताडमाड मंदिर, रिवण सांगे येथील श्रीविमलेश्वर देवस्थान, मंगेशी येथील श्रीमंगेश देवस्थान, ओझरी येथील महादेव मंदिर, काणकोण येथील श्रीमल्लीकार्जून, पार खांडेपार येथील महादेव मंदिर, आदी मंदिरांचा समावेश होता. या सर्व मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने अनेक ठिकाणी भाविकांसाठी खास फराळाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी मंदिरी, मनमंदिरी घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष
मंदिरी, मनमंदिरी घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष
महाशिवरात्री पर्वाने राज्यभरात शिवमय वातावरण पणजी : महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी राज्यातील शिवमंदिरे भाविकांची अलोट गर्दी आणि हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमली. गुऊवारी पहाटेपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत महादेवाच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे संपूर्ण गोवा शिवमय झाला होता. त्यानिमित्त सर्व मंदिरांमध्ये दुग्धाभिषेक, नामस्मरण, भजन, कीर्तन, यांसह विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हरवळे सांखळी येथील श्री […]
