नूतन जिल्हाधिकारी इमारत आराखड्यात बदल शक्य

मोजक्याच अंतरावर दगडाचे थर : बेसमेंट, कूपनलिका खोदाईसाठी अडथळा बेळगाव : येथील नियोजित नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी बांधकाम खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. माती परिक्षणाबरोबरच कूपनलिका खोदाई करून पाहणी करण्यात आली आहे. मोजक्याच अंतरावर कडक दगड लागत असल्याने इमारतीच्या कामात बदल करण्याचा विचार समोर आला आहे. त्यामुळे यात बदल होणार असल्याचे बांधकाम खात्याच्या […]

नूतन जिल्हाधिकारी इमारत आराखड्यात बदल शक्य

मोजक्याच अंतरावर दगडाचे थर : बेसमेंट, कूपनलिका खोदाईसाठी अडथळा
बेळगाव : येथील नियोजित नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी बांधकाम खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. माती परिक्षणाबरोबरच कूपनलिका खोदाई करून पाहणी करण्यात आली आहे. मोजक्याच अंतरावर कडक दगड लागत असल्याने इमारतीच्या कामात बदल करण्याचा विचार समोर आला आहे. त्यामुळे यात बदल होणार असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नियोजित नूतन जिल्हाधिकारी इमारत सहा मजली उभारण्यात येणार आहे. यासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे. दोन एकर जागा संपादित केली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून अनेकवेळा सर्वेक्षण करण्यात आले आहे. सध्या असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विविध खात्याच्या इमारतींचा सर्वेक्षण करण्यात आले आहे. जवळपास 30 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
दगडाच्या दर्जाची पाहणी
एरियल सर्वेक्षण करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, कंत्राट घेतलेल्या हुबळी येथील कंपनीकडून कूपनलिका खोदून दगडाचा दर्जा पाहण्यात आला होता. मोजक्याच अंतरावर दगड लागत असल्याने खर्च वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दोनमजली बेसमेंट व चार मजली इमारत अशा प्रकारे सहा मजली इमारत उभारली जाणार आहे.
दगड फोडून दोन मजलीबेसमेंट उभारणार
दगडाची अडचण निर्माण झाल्याने तळातील दोन मजले बेसमेंट खोदाई करणे खडतर काम असल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे इमारतीच्या नियोजित आराखड्यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोअरवेल मशीनच्या साहाय्याने खोदाई केल्यानंतर जमिनीचा दर्जा उत्तम असून यावर बहुमजली इमारत उभी करण्यास शक्य असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मात्र जमिनीमध्ये मोजक्याच अंतरावर दगड असल्याचे या तपासणीतून निदर्शनास आले आहे. त्यामुळे दगड फोडून दोन मजली बेसमेंट उभारण्यासाठी अतिरिक्त खर्चाचा भार पडण्याची शक्यता आहे. यामुळेच इमारत आराखड्यात बदल होऊ शकतो. यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Go to Source