गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल

आरोग्यावर परिणाम, खानापूर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ : विचित्र हवामानामुळे नागरिक त्रस्त खानापूर : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने विविध आजारानी डोके वर काढले आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाळी हवामान होते. दोन-तीनवेळा बऱ्यापैकी पाऊसही झाला होता. त्यामुळे सुगीच्या कामात अडथळा […]

गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल

आरोग्यावर परिणाम, खानापूर तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ : विचित्र हवामानामुळे नागरिक त्रस्त
खानापूर : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून हवामानात बदल झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याने विविध आजारानी डोके वर काढले आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वत्र रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी पावसाळी हवामान होते. दोन-तीनवेळा बऱ्यापैकी पाऊसही झाला होता. त्यामुळे सुगीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. तर गेल्या चार दिवसांपासून विचित्र हवामान आहे. रात्री 8 नंतर थोडीफार थंडी पडत आहे. तर पहाटेपासून सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण रहात आहे. त्यानंतर कडक ऊन पडत असून त्यामुळे विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या हवामानाचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, खोकला, सर्दी यासारख्या आजारानी पुन्हा डोके वर काढले असून सर्व रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे.
वारंवार हवामानाच्या बदलामुळे सातत्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याने दोन-दोन महिन्यांनी पुन्हा लोक या साथीच्या रोगानी आजारी पडत आहेत. डॉक्टरांकडून औषेधोपचार करून देखील आराम पडत नसल्याने डॉक्टर रोग्यांना विश्रांतीचा सल्ला देत आहेत. हवामान बदलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिना अर्धा संपला तरी अद्याप म्हणावी तशी थंडी पडत नाही. याचा परिणाम उष्णता वाढीवर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यात थंडीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात होते. मात्र अलीकडच्या काळात हुडहुडी भरणारी थंडीच गायब झाल्याने तालुक्यातील तापमानही वाढलेले दिसून येत आहे. याचाच परिणाम माणसाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

Go to Source