चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी होणार ‘एसबीआय’चे अध्यक्ष
दिनेश खारा यांची 28 ऑगस्टला सेवानिवृत्ती संमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सरकारी नियुक्ती निवड समिती फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरोने (एफएसआयबी) नुकतीच एसबीआयच्या अध्यक्षपदासाठी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांच्या नावाची शिफारस केली. सेट्टी यांची जानेवारी 2020 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली होती. सध्या त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय बँकिंग, ग्लोबल मार्केट्स आणि टेक्नॉलॉजी विभागांचा कार्यभार आहे. ते विद्यमान अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांची जागा घेतील. खारा हे 28 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर एसबीआयचे अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी पदभार स्वीकारतील.
Home महत्वाची बातमी चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी होणार ‘एसबीआय’चे अध्यक्ष
चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी होणार ‘एसबीआय’चे अध्यक्ष
दिनेश खारा यांची 28 ऑगस्टला सेवानिवृत्ती संमती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सरकारी नियुक्ती निवड समिती फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरोने (एफएसआयबी) नुकतीच एसबीआयच्या अध्यक्षपदासाठी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांच्या नावाची शिफारस केली. सेट्टी यांची जानेवारी 2020 मध्ये व्यवस्थापकीय संचालक […]