एआयबी परीक्षा दिलेल्या 250 वकिलांनी दिले प्रमाणपत्र

बार असोसिएशन मतदार यादींचे काम अंतिम टप्प्यात : 25 रोजी अंतिम यादी बेळगाव : बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी ज्या वकिलांनी ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा पास झाली आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. त्यामुळे 250 हून अधिक वकिलांनी बार असोसिएशनकडे त्या परीक्षेचे प्रमाणपत्र दिले आहे. […]

एआयबी परीक्षा दिलेल्या 250 वकिलांनी दिले प्रमाणपत्र

बार असोसिएशन मतदार यादींचे काम अंतिम टप्प्यात : 25 रोजी अंतिम यादी
बेळगाव : बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी ज्या वकिलांनी ऑल इंडिया बार कौन्सिलची परीक्षा पास झाली आहे त्यांनाच मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. त्यामुळे 250 हून अधिक वकिलांनी बार असोसिएशनकडे त्या परीक्षेचे प्रमाणपत्र दिले आहे. 25 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. ऑल इंडिया बार कौन्सिलने 14 जुलै 2010 पासून ज्यांनी एलएलबी केली आहे त्या व्यक्तींने ऑल इंडिया बार कौन्सिलची इंटरशिप परीक्षा देणे बंधनकारक आहे. मात्र काही जणांनी अजूनही ती परीक्षा दिली नाही. सदर परीक्षा दिल्याशिवाय वकिली व्यावसाय करणेही अशक्य आहे. मात्र काहीजण ज्येष्ठ वकिलांकडे काम करून सध्या वकिली करत आहेत. मागील निवडणुकांमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. मात्र त्यांना मतदानाचा अधिकारही देणे अशक्य आहे. कारण याबाबत ऑल इंडिया बार कौन्सिलनेच त्याबाबत सूचना केली आहे.
काही दिवसांपूर्वी एआयबी इंटरशिप परीक्षा पास झालेले प्रमाणपत्र बार असोसिएशनकडे द्यावे, असे आवाहन जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी केले होते. त्याची दखल घेत आतापर्यंत 250 हून अधिक जणांनी परीक्षेचे प्रमाणपत्र दिले आहे. ज्यांनी ते प्रमाणपत्र दिले आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. जानेवारी 25 पर्यंत मतदान यादी तयार करण्याचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर छाननी करून अंतिम मतदार यादी जाहीर करणार असल्याचे जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी सांगितले. 9 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीपूर्वीच मतदानाचा अधिकार योग्य व्यक्तींनाच देण्याबाबत आपला आग्रह आहे. अनेकजण दोन ठिकाणी मतदान करत होते. मात्र त्यांनाही एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. दोन ठिकाणी सध्याच्या मतदार यादीतून नावे कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.