भंगार वाहने हटविण्याचा सीईओंचा आदेश

कॅन्टोन्मेंटकडून 12 मार्चपासून स्वत: वाहने हटविण्याचा इशारा : कॅम्प परिसरात दुचाकी-चारचाकींसह अवजड वाहनांचा समावेश बेळगाव : कॅम्प येथे अनेक ठिकाणी कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांमध्ये वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. भंगारातील वाहनेही वर्षानुवर्षे पडून आहेत. अशा वाहनांमुळे विनाकारण अडचण निर्माण होत असून ही वाहने सोमवार दि. 11 मार्चपर्यंत हलविण्याचे आदेश सीईओ राजीव कुमार यांनी नागरिकांना दिले आहेत. […]

भंगार वाहने हटविण्याचा सीईओंचा आदेश

कॅन्टोन्मेंटकडून 12 मार्चपासून स्वत: वाहने हटविण्याचा इशारा : कॅम्प परिसरात दुचाकी-चारचाकींसह अवजड वाहनांचा समावेश
बेळगाव : कॅम्प येथे अनेक ठिकाणी कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांमध्ये वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. भंगारातील वाहनेही वर्षानुवर्षे पडून आहेत. अशा वाहनांमुळे विनाकारण अडचण निर्माण होत असून ही वाहने सोमवार दि. 11 मार्चपर्यंत हलविण्याचे आदेश सीईओ राजीव कुमार यांनी नागरिकांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना जुनी वाहने खुल्या जागा, तसेच रस्त्याच्या शेजारून हलवावी लागणार आहेत. फिश मार्केट, वाहतूक पोलीस स्टेशन पाठीमागे अनेक जुनी वाहने वर्षानुवर्षे पडून आहेत. तसेच काही चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारे कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांमध्ये वाहने लावत आहेत. यामुळे विनाकारण नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषत: फिश मार्केट येथे दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. परंतु, रस्त्याशेजारी लावण्यात आलेल्या ट्रकांमुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. सोमवारी एका कार्यक्रमासाठी सीईओ राजीव कुमार फिश मार्केट परिसरात आले होते. यावेळी त्यांनी रस्त्याशेजारी लावण्यात आलेले ट्रक पाहिले. तात्काळ या ट्रकमधील हवा काढण्याची सूचना त्यांनी केली. कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांनी ट्रकमधील हवा सोडली. संबंधित मालकाने आपण दोन दिवसांत येथून ट्रक इतरत्र हलवू, असे सांगितल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली.
11 मार्चपर्यंत वाहनचालकांना मुदत
कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचा धाक राहिला नसल्याने मागील काही वर्षांत कॅम्पमध्ये अनेक ठिकाणी जुनी वाहने टाकून देण्यात आली आहेत. भंगारातील वाहने वर्षानुवर्षे कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागांवर पडून असल्याने त्याचा वापर नागरिकांनाही करता येत नाही. अशा वाहनचालकांना 11 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून 12 मार्चपासून कॅन्टोन्मेंट स्वत: ही वाहने हलवेल, असा इशारा सीईओ राजीव कुमार यांनी दिला आहे.