उन्हाळी सुट्टीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. या काळात गर्दीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध जाहीर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कल्याण, आणि मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), तसेच पुणे विभागातील पुणे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असणार आहे. विभागीय अधिकारी आणि स्टेशन पर्यवेक्षकांना प्लॅटफॉर्म तिकीटाचा प्रवेश ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, निरक्षर व्यक्ती, आजारी, आणि महिला प्रवाशांसोबत आलेल्या व्यक्तींना देण्यात केवळ देण्यात येणार आहे. याशिवाय, तात्पुरते निर्बंध आणि अपवाद याबाबतची माहिती प्रवाशांना स्पष्टपणे कळवावी, असे निर्देश मध्य रेल्वेने दिले आहेत. नोटीस बुकिंग विंडोवर ठळकपणे प्रदर्शित केल्या जातील आणि स्टेशनच्या सार्वजनिक पत्ता प्रणालीद्वारे नियमितपणे घोषणा केल्या जातील.हेही वाचासमृद्धी महामार्गावर इंटेलिजंट सिस्टमची नजर
नवी मुंबईतील मेट्रो लाईन 8 प्रकल्प सिडको हाती घेणार
मुंबईतल्या ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद