Miraj News : विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेची धडक कारवाई ; वर्षभरात ३३ कोटी दंड वसूल

                                        मिरज व सोलापूर मार्गावर वर्षभरात ३३ कोटी दंड वसूल मिरज : रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुध्द मध्य रेल्वे प्रशासनाने मेगा तिकीट तपासणी मोहिम राबवून वर्षभरात धडक कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ […]

Miraj News : विनातिकीट प्रवाशांवर मध्य रेल्वेची धडक कारवाई ; वर्षभरात ३३ कोटी दंड वसूल

                                        मिरज व सोलापूर मार्गावर वर्षभरात ३३ कोटी दंड वसूल
मिरज : रेल्वे प्रवासात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुध्द मध्य रेल्वे प्रशासनाने मेगा तिकीट तपासणी मोहिम राबवून वर्षभरात धडक कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर मार्गावर विशेष तिकिट तपासणी मोहिम राबवून तब्बल सहा लाख, ४४ हजार प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून ३३ कोटी, १९ लाखांचा दंड वसूल केला.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने गेल्या वर्षभरात पुणे विभागातील पुणे स्थानकासह सातारा, कराड, मिरज, किर्लोस्करवाडी, सांगली, कोल्हापूर व सोलापूर विभागातील सोलापूर, पंढरपूरसह विविध लहान-मोठ्या स्थानकांवर मेगा तिकिट तपासणी मोहिम राबविली. तपासणी मोहिमेत पुणे विभागात ३ लाख, ८४ हजार विनातिकिट प्रवास करणारे प्रवाशी सापडले.
त्यांच्याकडून २३ कोटी, ७३ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सोलापूर विभागात दोन लाख, सहा हजार प्रवाशी विनातिकिटांचा प्रवास करताना आढळले, त्यांच्याकडून नऊ कोटी, ४६ लाखांचा दंड वसूल केला. मध्य रेल्वे प्रशासनाने अनधिकृत प्रवासी शोधण्यासाठी बहुआयामी धोरण स्वीकारले आहे. स्टेशन तपासणी, अॅम्बुश तपासणी, सघन तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम यांचा समावेश आहे. ही कारवाई मेल/एक्सप्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, विशेष गाड्या तसेच उपनगरीय गाड्यांमध्ये केली जाते. प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करावा. अन्यथा रेल्वे प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.