दिवा स्थानकात गोंधळ, लोकलचा दरवाजा बंद असल्याने प्रवासी संतप्त
मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे सध्या ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवर प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. शनिवारी सकाळच्याच वेळी दिवा स्थानकाच तुडूंब गर्दी पाहायला मिळाली. दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली. इथं गर्दी असल्यामुळं रेल्वेचा दरवाजा बंद करण्यात आला होता, पण प्रवाशांनी हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि तिथं एकच आरडाओरडा झाला. पाचशेहून अधिक लोकल रद्द मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान ब्लॉक काळात रेल्वे प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा. शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करताना रेल्वे प्रशासनानं स्पष्ट सांगितल्यानुसार शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. परिणामस्वरुप 534 लोकल आणि 37 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून 63 तासांचा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु झाला आहे. शुक्रवारी आणि आज शनिवारी अनेकांना सुट्टी मिळालेली नाही. यामुळे कामावर जाण्यासाठी अनेकांना उलटा आणि दगदगीचा प्रवास प्रवाशांना करावा लागणार आहे. कल्याण-कसारा-कर्जत दिशेकडील कर्मचाऱ्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करून चर्चगेटपर्यंत पोहोचावे लागणार आहे.या कारणामुळे मेगाब्लॉक गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मेगाब्लॉक 2 जूनपर्यंत असणार आहे. यामागे महत्त्वाचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10-11 च्या लांबीकरणाचं काम सुरु आहे. या फलाट क्रमांकावरुन 24 डब्यांच्या प्रवासी गाड्या जाण्यासाठी फलाटाची लांबी वाढवणे आवश्यक होते. ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू झाला आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.
Home महत्वाची बातमी दिवा स्थानकात गोंधळ, लोकलचा दरवाजा बंद असल्याने प्रवासी संतप्त
दिवा स्थानकात गोंधळ, लोकलचा दरवाजा बंद असल्याने प्रवासी संतप्त
मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे सध्या ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवर प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे.
शनिवारी सकाळच्याच वेळी दिवा स्थानकाच तुडूंब गर्दी पाहायला मिळाली. दिवा स्थानकातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली. इथं गर्दी असल्यामुळं रेल्वेचा दरवाजा बंद करण्यात आला होता, पण प्रवाशांनी हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आणि तिथं एकच आरडाओरडा झाला.
पाचशेहून अधिक लोकल रद्द
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान ब्लॉक काळात रेल्वे प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा. शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा असं स्पष्ट आवाहन करताना रेल्वे प्रशासनानं स्पष्ट सांगितल्यानुसार शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत. परिणामस्वरुप 534 लोकल आणि 37 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून 63 तासांचा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु झाला आहे. शुक्रवारी आणि आज शनिवारी अनेकांना सुट्टी मिळालेली नाही. यामुळे कामावर जाण्यासाठी अनेकांना उलटा आणि दगदगीचा प्रवास प्रवाशांना करावा लागणार आहे. कल्याण-कसारा-कर्जत दिशेकडील कर्मचाऱ्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करून चर्चगेटपर्यंत पोहोचावे लागणार आहे.
या कारणामुळे मेगाब्लॉक
गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मेगाब्लॉक 2 जूनपर्यंत असणार आहे. यामागे महत्त्वाचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10-11 च्या लांबीकरणाचं काम सुरु आहे. या फलाट क्रमांकावरुन 24 डब्यांच्या प्रवासी गाड्या जाण्यासाठी फलाटाची लांबी वाढवणे आवश्यक होते.
ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू झाला आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत.