मध्य रेल्वेचा 1 ऑक्टोबरला कर्जत स्थानकात मेगाब्लॉक

कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी नॉन-इंटरलॉकिंगच्या कामाचा भाग म्हणून मध्य रेल्वे (central railway) 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 ते सायंकाळी 5.20 पर्यंत विशेष ब्लॉक (block) घेणार आहे. हे काम 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत चालू असलेल्या ब्लॉकचाच एक भाग आहे. ब्लॉक दरम्यान, कर्जत (karjat yard) आणि खोपोली दरम्यान अप किंवा डाउन लोकल सेवा चालणार नाहीत. हा प्रभावित मार्ग भिवपुरी स्टेशन – जांबरुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन – कर्जत पर्यंत पसरलेला आहे. 1 ऑक्टोबर रोजी लोकल रद्द अप लोकल रद्द – सकाळी 11.20, दुपारी 12.40 आणि दुपारी 2.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली – कर्जत (karjat) लोकल गाड्या रद्द केल्या जातील. डाउन लोकल रद्द – दुपारी 12 वाजता सुटणाऱ्या कर्जत – खोपोली लोकल गाड्या दुपारी 1.15 आणि दुपारी 3.39 वाजता सुटेल. लोकल अंशतः रद्द – सकाळी 9.01, सकाळी 9.30, 9.57, 11.14 आणि दुपारी 1.40 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल गाड्या नेरळ पर्यंत चालवल्या जातील. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द केल्या जातील – ठाणे (thane) – कर्जत लोकल दुपारी 12.05 वाजता नेरळ पर्यंत चालवल्या जातील. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द केल्या जातील. – दुपारी 12.20 वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल नेरळ येथे रद्द केली जाईल. नेरळ – खोपोली लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही – सकाळी 20.36 आणि दुपारी 2.45 वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथ पर्यंत चालवली जाईल. अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द केली जाईल – दुपारी 1.19 वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल ठाण्यात रद्द केली जाईल. ठाणे – कर्जत दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. ब्लॉक कालावधीत विलंब आणि वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वेकडून अपडेट्स तपासावेत असा सल्ला देण्यात येत आहे.हेही वाचा अंधेरी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरात फलकाची मनसेकडून तोडफोड मुंबई विद्यापीठात नवीन अभ्यासक्रमाला सुरूवात

मध्य रेल्वेचा 1 ऑक्टोबरला कर्जत स्थानकात मेगाब्लॉक

कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी नॉन-इंटरलॉकिंगच्या कामाचा भाग म्हणून मध्य रेल्वे (central railway) 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 ते सायंकाळी 5.20 पर्यंत विशेष ब्लॉक (block) घेणार आहे. हे काम 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत चालू असलेल्या ब्लॉकचाच एक भाग आहे.ब्लॉक दरम्यान, कर्जत (karjat yard) आणि खोपोली दरम्यान अप किंवा डाउन लोकल सेवा चालणार नाहीत. हा प्रभावित मार्ग भिवपुरी स्टेशन – जांबरुंग केबिन – ठाकूरवाडी – नागनाथ केबिन – कर्जत पर्यंत पसरलेला आहे.1 ऑक्टोबर रोजी लोकल रद्दअप लोकल रद्द– सकाळी 11.20, दुपारी 12.40 आणि दुपारी 2.55 वाजता सुटणाऱ्या खोपोली – कर्जत (karjat) लोकल गाड्या रद्द केल्या जातील.डाउन लोकल रद्द– दुपारी 12 वाजता सुटणाऱ्या कर्जत – खोपोली लोकल गाड्या दुपारी 1.15 आणि दुपारी 3.39 वाजता सुटेल.लोकल अंशतः रद्द– सकाळी 9.01, सकाळी 9.30, 9.57, 11.14 आणि दुपारी 1.40 वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल गाड्या नेरळ पर्यंत चालवल्या जातील. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द केल्या जातील– ठाणे (thane) – कर्जत लोकल दुपारी 12.05 वाजता नेरळ पर्यंत चालवल्या जातील. नेरळ – कर्जत लोकल सेवा रद्द केल्या जातील.– दुपारी 12.20 वाजता सुटणारी सीएसएमटी – खोपोली लोकल नेरळ येथे रद्द केली जाईल. नेरळ – खोपोली लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही– सकाळी 20.36 आणि दुपारी 2.45 वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल अंबरनाथ पर्यंत चालवली जाईल. अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द केली जाईल– दुपारी 1.19 वाजता सुटणारी सीएसएमटी – कर्जत लोकल ठाण्यात रद्द केली जाईल. ठाणे – कर्जत दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही.ब्लॉक कालावधीत विलंब आणि वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असल्याने, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी मध्य रेल्वेकडून अपडेट्स तपासावेत असा सल्ला देण्यात येत आहे.हेही वाचाअंधेरी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरात फलकाची मनसेकडून तोडफोडमुंबई विद्यापीठात नवीन अभ्यासक्रमाला सुरूवात

Go to Source