उरण–बेलापूर/नेरूळ मार्गावर अतिरिक्त लोकल सेवा सुरू

सोमवारपासून मध्य रेल्वेने बेलापूर/नेरूळ-उरण मार्गावर उपनगरीय लोकलच्या पाच अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नवीन सेवांची भर पडल्यामुळे उरण मार्गावरील दररोजच्या लोकल फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी सुधारणा झाली आहे. या विस्ताराचा भाग म्हणून तारघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेले तारघर स्थानक प्रवाशांसाठी विशेष सोयीचे ठरणार आहे. तर गव्हाण स्थानकामुळे परिसरातील उपनगरीय रेल्वे जोडणी अधिक सुलभ होणार आहे. अतिरिक्त लोकल सेवांमुळे रेल्वेच्या कार्यकाळातही वाढ झाली आहे. उरण येथून लोकल सेवा सकाळी 5.35 वाजता (पहिली लोकल) सुरू होऊन रात्री 10.05 वाजेपर्यंत (शेवटची लोकल) चालणार आहेत. बेलापूरहून लोकल सेवा सकाळी 5.45 ते रात्री 10.15 या वेळेत उपलब्ध असतील.नेरूळहून उपनगरीय लोकल सेवा सकाळी 6.05 ते रात्री 9.30 या वेळेत चालणार आहेत. गर्दीच्या वेळेत वाढवलेल्या लोकल फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

उरण–बेलापूर/नेरूळ मार्गावर अतिरिक्त लोकल सेवा सुरू

सोमवारपासून मध्य रेल्वेने बेलापूर/नेरूळ-उरण मार्गावर उपनगरीय लोकलच्या पाच अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.नवीन सेवांची भर पडल्यामुळे उरण मार्गावरील दररोजच्या लोकल फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी सुधारणा झाली आहे.या विस्ताराचा भाग म्हणून तारघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानके कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेले तारघर स्थानक प्रवाशांसाठी विशेष सोयीचे ठरणार आहे. तर गव्हाण स्थानकामुळे परिसरातील उपनगरीय रेल्वे जोडणी अधिक सुलभ होणार आहे.अतिरिक्त लोकल सेवांमुळे रेल्वेच्या कार्यकाळातही वाढ झाली आहे. उरण येथून लोकल सेवा सकाळी 5.35 वाजता (पहिली लोकल) सुरू होऊन रात्री 10.05 वाजेपर्यंत (शेवटची लोकल) चालणार आहेत.बेलापूरहून लोकल सेवा सकाळी 5.45 ते रात्री 10.15 या वेळेत उपलब्ध असतील.नेरूळहून उपनगरीय लोकल सेवा सकाळी 6.05 ते रात्री 9.30 या वेळेत चालणार आहेत.गर्दीच्या वेळेत वाढवलेल्या लोकल फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Go to Source