कोगे येथे सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
कसबा बीड प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथील सेट्रींग कामगार बाजीराव सदाशिव चव्हाण वय 45 यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत बाजीराव चव्हाण हे अनेक वर्षे सेंट्रींग कामगार म्हणून काम करीत होते . ते अल्पभू शेतकरी असल्याने घरची बेताचीच परिस्थिती होती. राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली , एक मुलगा असा परिवार आहे. सेट्रिंग काम व मोलमजुरी करणाऱ्या बाजीरावने आत्महत्या केल्याने कोगे गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. करवीर पोलीसचे बीट अंमलदार विजय गुरव पुढील तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी कोगे येथे सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
कोगे येथे सेंट्रींग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
कसबा बीड प्रतिनिधी कोगे तालुका करवीर येथील सेट्रींग कामगार बाजीराव सदाशिव चव्हाण वय 45 यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत बाजीराव चव्हाण हे अनेक वर्षे सेंट्रींग कामगार म्हणून काम करीत होते . ते अल्पभू शेतकरी असल्याने घरची बेताचीच परिस्थिती होती. राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन […]
