अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत ‘सीईसी’चे राज्यांना निर्देश

अधिकाऱ्यांची निकटच्या जिल्ह्यात बदली न करण्याची सूचना वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (सीईसी) अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगबाबत मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कोणत्याही ठिकाणी तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच लोकसभा मतदारसंघातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती […]

अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत ‘सीईसी’चे राज्यांना निर्देश

अधिकाऱ्यांची निकटच्या जिल्ह्यात बदली न करण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (सीईसी) अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगबाबत मोठे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाने सर्व राज्य सरकारांना काही निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार कोणत्याही ठिकाणी तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्याच लोकसभा मतदारसंघातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती केली जाणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार जे अधिकारी एकतर त्यांच्या गृहजिह्यात तैनात होते किंवा एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये निवडणुकीच्या कामाशी थेट किंवा पर्यवेक्षकीय क्षमतेने कोणत्याही प्रकारे जोडलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि निष्पक्ष निवडणुकांच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आयोगाने राज्यातील विविध अधिकाऱ्यांच्या अगदी वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते.