दहावी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 1551 खोल्यांपैकी 1493 वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बेळगाव : एसएसएलसी परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. याबरोबरच आता परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक नजर ठेवण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 96 तर चिकोडी शैक्षणिक […]

दहावी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 1551 खोल्यांपैकी 1493 वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही
बेळगाव : एसएसएलसी परीक्षेमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. याबरोबरच आता परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारीक नजर ठेवण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 96 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 126 केंद्रांवर एसएसएलसी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे आदेश दिले आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 1551 खोल्यांपैकी 1493 वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 1967 परीक्षा वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गटशिक्षणाधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच काही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कशाप्रकारे व्यवस्था असावी, याची माहिती घेण्यात आली आहे. एकाच शाळेतील कर्मचारी परीक्षा केंद्रांवर राहणार नाहीत, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी कॉपीचे प्रकार अधिक प्रमाणात चालतात, अशा ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.
सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात
एसएसएलसी परीक्षा पारदर्शक होण्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक विभागवार बैठका घेतल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यात सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
-मोहनकुमार हंचाटे (जिल्हाशिक्षणाधिकारी)