के.आर्मस्ट्राँग हत्येची सीबीआय चौकशी करा
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तामिळनाडू येथील बहुजन समाज पार्टीचे राज्याध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची चेन्नई पेरंबुरी येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा बेळगाव जिल्हा बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे दि. 5 जुलै रोजी राज्याध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची हत्या करण्यात आली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील जातीयता, असमानता, अस्पृश्यता, अन्यायाविरोधात मागासवर्गीयांच्या बाजूने व धार्मिक अल्पसंख्याकासाठी के. आर्मस्ट्राँग यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांची हत्या करण्यामागे प्रभावी व्यक्तींचा हात आहे.
हत्येनंतर काही तासांमध्येच आठ जणांनी हत्या केल्याचे सांगत शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्येच्या घटनेमागे राजकीय हस्तक्षेप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीतर्फे केली आहे. एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याची हत्या होणे अत्यंत दुर्दैवी घटना असून तेथील राज्य सरकारची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुप्तचर यंत्रणाही अपयशी ठरली आहे. तामिळनाडूमध्ये कायदा व सुव्यवस्था कोलमडला आहे, असा आरोपही करण्यात आला.
Home महत्वाची बातमी के.आर्मस्ट्राँग हत्येची सीबीआय चौकशी करा
के.आर्मस्ट्राँग हत्येची सीबीआय चौकशी करा
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : तामिळनाडू येथील बहुजन समाज पार्टीचे राज्याध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची चेन्नई पेरंबुरी येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा बेळगाव जिल्हा बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे दि. 5 जुलै रोजी राज्याध्यक्ष के. आर्मस्ट्राँग […]