यष्टिचितच्या ‘डीआरएस’वर होणार नाही झेलबादचा विचार

‘आयसीसी’कडून नियमात बदल : झेलबादसाठी स्वतंत्र ‘डीआरएस’ मागावा लागणार वृत्तसंस्था /दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) नियमांत लक्षणीय बदल केला असून त्यानुसार यापुढे ‘डीआरएस’दरम्यान एखादा खेळाडू यष्टिचित झालेला आहे की नाही हे ठरविताना आणि निर्णयाचे पुनरावलोकन करताना तो झेलबाद झालेला आहे का हे पाहिले जाणार नाही आणि फक्त ‘साइड-ऑन रिप्ले’ पाहिले जातील. हा बदल 12 डिसेंबर, […]

यष्टिचितच्या ‘डीआरएस’वर होणार नाही झेलबादचा विचार

‘आयसीसी’कडून नियमात बदल : झेलबादसाठी स्वतंत्र ‘डीआरएस’ मागावा लागणार
वृत्तसंस्था /दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) नियमांत लक्षणीय बदल केला असून त्यानुसार यापुढे ‘डीआरएस’दरम्यान एखादा खेळाडू यष्टिचित झालेला आहे की नाही हे ठरविताना आणि निर्णयाचे पुनरावलोकन करताना तो झेलबाद झालेला आहे का हे पाहिले जाणार नाही आणि फक्त ‘साइड-ऑन रिप्ले’ पाहिले जातील. हा बदल 12 डिसेंबर, 2023 पासून अंमलात आला आहे आणि त्यानुसार एखाद्या संघाला खेळाडू यष्टिचित झालेला आहे की नाही हे ठरविण्याच्या प्रक्रियेदरम्यान तो झेलबाद झालेला आहे की नाही हेही पाहिलेले हवे असेल, तर त्या अपिलसाठी स्वतंत्रपणे ‘डीआरएस’ पर्याय वापरावा लागेल. गेल्या वर्षीच्या सुऊवातीला भारताविऊद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीने संघाचे ‘डीआरएस’ पर्याय न संपवता फलंदाज यष्टिचित झाल्यानंतर तो झेलबाद आहे की नाही याचीही खातरजमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुनरावलोकनाचा वापर केला होता.
आता, यष्टिचित झाल्याचे अपिल समोर आल्यानंतर केवळ साइड-ऑन कॅमेऱ्याच्या प्रतिमा प्रदर्शित केल्या जातील आणि पंच फक्त त्यांचा विचार करतील. ते चेंडूला बॅटची कड लागलेली आहे की नाही याची तपासणी करणार नाहीत. त्याचप्रमाणे ‘आयसीसी’ने ज्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली आहे अशा खेळाडूच्या ऐवजी बदली खेळाडू उतरविण्यासंदर्भातील नियमातही अधिक स्पष्टता आणली आहे. जर बदललेल्या खेळाडूला ‘कॉन्कशन’च्या वेळी गोलंदाजी करण्यापासून निलंबित केले गेले असेल, तर आता बदली खेळाडूला गोलंदाजी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे, ‘आयसीसी’ने मैदानावर दुखापतीची तपासणी आणि उपचारांसाठी निर्धारित वेळ चार मिनिटांपर्यंत मर्यादित ठेवली आहे. ‘आयसीसी’च्या या नियमातील बदलांसह ‘बीसीसीआय’ने शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या रणजी चषक स्पर्धेसाठी गतवर्षी सय्यद मुश्ताक अली चषक आणि विजय हजारे चषक स्पर्धेदरम्यान लागू केलेले ‘डेड बॉल’ आणि एका षटकामागे दोन बाऊन्सरचे नियम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.