खानापुरात परिवहनकडून कॅशलेस तिकीट सेवेला प्रारंभ

वार्ताहर /नंदगड प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने युपीआय पेमेंट सुविधा सुरू केली आहे. बस प्रवाशांना तिकीट घेतल्यानंतर गुगल पे, फोन पे व अन्य कोणत्याही युपीआय पेमेंटच्या माध्यमातून किंवा कोड स्कॅन करून तिकिटाचे शुल्क अदा करता येणार आहे. खानापूर बस आगारातील अधिकाऱ्यांनी या सेवेचा प्रारंभ सोमवारी केला. बसमधील वाहकाला क्यूआर कोडचे कार्ड देण्यात आले आहे. ऑनलाईन […]

खानापुरात परिवहनकडून कॅशलेस तिकीट सेवेला प्रारंभ

वार्ताहर /नंदगड
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाने युपीआय पेमेंट सुविधा सुरू केली आहे. बस प्रवाशांना तिकीट घेतल्यानंतर गुगल पे, फोन पे व अन्य कोणत्याही युपीआय पेमेंटच्या माध्यमातून किंवा कोड स्कॅन करून तिकिटाचे शुल्क अदा करता येणार आहे. खानापूर बस आगारातील अधिकाऱ्यांनी या सेवेचा प्रारंभ सोमवारी केला. बसमधील वाहकाला क्यूआर कोडचे कार्ड देण्यात आले आहे. ऑनलाईन पेमेंट करून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा निर्धारित तिकीट दर, क्यूआर कोड स्कॅन करून अदा करता येणार आहे. बस आगाराच्या मुख्य खात्याशी हे व्यवहार जोडले असल्याने ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे चिल्लरवरून वाहक आणि प्रवाशांमधील वादावादीचे प्रकार थांबणार आहेत. लांबपल्ला व जवळच्या सर्वच बसेसना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खानापूर तालुक्यातील सर्वच बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध केली आहे. परंतू खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात अद्याप मोबाईल नेटवर्कची सुविधा नाही. अशा ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.