Badlapur: बदलापूर आंदोलन प्रकरणी 300 जणांवर गुन्हा दाखल, 40 जणांना अटक
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे मुलींच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात मंगळवारी संतप्त नागरिकांनी गदारोळ केला. रेल्वे रोखण्यात आली. रेल्वे स्थानकावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. अफवांवर आळा घालण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून आंदोलन करणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या 300 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 40 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दोन चिमुकलींच्या लैंगिक शोषण निषेधार्थ बदलापूरात रेलरोको निर्दशने करण्यात आली. या काळात मध्य रेल्वेच्या काही रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या. आंदोलकांनी शाळेत तोडफोड केली आणि रेल्वे रुळावर दगडफेक केली. पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांवर देखील लोकांनी दगडफेक केली. 10 तासांनंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणि रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली.
काय आहे हे प्रकरण –
बदलापूर पूर्वेतील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन लहान चिमुकलींचा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ही घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली. आरोपी हा मुलींच्या स्वछतागृहात स्वछता करतो त्याची नियुक्ती कंत्राट पद्धतीने केली आहे. आरोपीला अटक केली आहे.
Edited by – Priya Dixit