ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, विदेशी दारू (alcohol) आणि पैशांनी (cash) भरलेली 26 पाकिटे ठाकरे गटाच्या गोरीवले यांच्या वाहनात आढळून आली. मात्र हे प्रकरण खोटे असल्याचा आरोप दिघे यांनी केला. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या विरोधात केदार दिघे निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केदार दिघे यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरीवाले, प्रदीप शेंडगे, रवींद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवाले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रिद यांना कोपरीच्या अष्टविनायक चौक परिसरात अटक करण्यात आली. संगनमताने त्यांनी दारू आणि पैसे असलेली 26 पाकिटे ठेवली. तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केदार दिघे यांना विचारणा केली असता त्यांनी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला. भरारी टीमने तपासण्यासाठी आमचे वाहन पोलिस स्टेशनच्या बाहेर आणले होते. त्यावेळी काहीही सापडले नाही, त्यांच्याकडे त्या संदर्भाचे फुटेज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अधिकारी घाबरले असून, मी स्वत:हून माझी गाडी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर गाडीत काहीही सापडले नाही. गुन्ह्यात माझे नाव घेऊन जाणीवपूर्वक मला टार्गेट करत असल्याचा पलटवार शिवसेना उबाठा (shiv sena ubt) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे. कोपरी पाचपाखाडीत ज्यांनी पैशाचा महापूर आणला आहे, जे साड्या वाटप करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. पण माझी गाडी तपासतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये कारमध्ये काहीही सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, काल रात्रीच्या घटनेनंतर मुद्दाम गुन्हा दाखल करण्यात आला. केदार दिघे म्हणाले की, केवळ माझी बदनामी करण्याचा हेतू असून पैशांचा महापूर आणून साड्यांचे वाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही ही आश्चर्याची बाब आहे.हेही वाचा तारापूरमध्ये गोदामाला भीषण आग मुंबईतील नोव्हेंबर 2017 नंतरचा दुसरा सर्वात थंड दिवस

ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, विदेशी दारू (alcohol) आणि पैशांनी (cash) भरलेली 26 पाकिटे ठाकरे गटाच्या गोरीवले यांच्या वाहनात आढळून आली. मात्र हे प्रकरण खोटे असल्याचा आरोप दिघे यांनी केला.कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या विरोधात केदार दिघे निवडणूक लढवत आहेत. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केदार दिघे यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघे, सचिन गोरीवाले, प्रदीप शेंडगे, रवींद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवाले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रिद यांना कोपरीच्या अष्टविनायक चौक परिसरात अटक करण्यात आली. संगनमताने त्यांनी दारू आणि पैसे असलेली 26 पाकिटे ठेवली. तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत केदार दिघे यांना विचारणा केली असता त्यांनी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला. भरारी टीमने तपासण्यासाठी आमचे वाहन पोलिस स्टेशनच्या बाहेर आणले होते. त्यावेळी काहीही सापडले नाही, त्यांच्याकडे त्या संदर्भाचे फुटेज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अधिकारी घाबरले असून, मी स्वत:हून माझी गाडी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर गाडीत काहीही सापडले नाही. गुन्ह्यात माझे नाव घेऊन जाणीवपूर्वक मला टार्गेट करत असल्याचा पलटवार शिवसेना उबाठा (shiv sena ubt) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांनी केला आहे.कोपरी पाचपाखाडीत ज्यांनी पैशाचा महापूर आणला आहे, जे साड्या वाटप करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. पण माझी गाडी तपासतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये कारमध्ये काहीही सापडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, काल रात्रीच्या घटनेनंतर मुद्दाम गुन्हा दाखल करण्यात आला. केदार दिघे म्हणाले की, केवळ माझी बदनामी करण्याचा हेतू असून पैशांचा महापूर आणून साड्यांचे वाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही ही आश्चर्याची बाब आहे.हेही वाचातारापूरमध्ये गोदामाला भीषण आगमुंबईतील नोव्हेंबर 2017 नंतरचा दुसरा सर्वात थंड दिवस

Go to Source