फ्लाइट चुकल्याने बॉयफ्रेंड विरोधात खटला
दिलेला शब्द पूर्ण न केल्याची प्रेयसीची तक्रार
कुठलेही नाते टिकविण्यासाठी स्वत: दिलेले शब्द पूर्ण करणे प्रत्येकालाच शक्य नसते. विशेषकरून जेव्हा केवळ तोंडी आश्वासने पूर्ण होत नाहीत तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला अत्यंत वाईट वाटू शकते. यामुळे भांडण होण्यास वेळ लागत नाही. काही असाच प्रकार एका युवतीसोबत घडला आहे. न्यूझीलंडच्या महिलेने या भांडणाला पुढे नेत स्वत:च्या प्रियकराच्या विरोधात न्यायालयात खटलाच दाखल केला आहे.
प्रियकराने विमानतळापर्यंत सोडण्यासाठी येणार असा शब्द दिला होता, परंतु तो त्याने पाळला नाही. मी वेळेचे महत्त्व आणि दिलेला शब्द पाळण्याला महत्त्व देते असे या युवतीचे म्हणणे आहे. न्यूझीलंडच्या या युवतीने स्वत:च्या दीर्घकाळापासून असलेल्या प्रियकरावर ‘वर्बल कॉन्ट्रॅक्ट’चे उल्लंघन केल्यामुळे खटला दाखल केला आहे. विमानतळावर त्याने न पोहोचविल्याने माझी म्युझिक कॉन्सर्टची फ्लाइट च्gकली. मला एक दिवस विलंबाने जावे लागले. मी 6.5 वर्षांपासून त्या इसमासोबत रिलेशनशिपमध्ये होते असे या युवतीचे सांगणे आहे.
या युवतीची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. प्रियकर मला विमानतळावर सोडण्यासाठी येणार होता आणि मग माझ्या दोना श्वानांची देखभाल करण्यासाठी माझ्या घरी थांबणार होता. त्याला एक दिवस आधी मी मेसेजही केला होता. परंतु त्याने मेसेजला कुठलाच प्रतिसाद दिला नव्हता. यामुळे मला ट्रिप रद्द करावी लागली. तसेच दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी अधिक रक्कम खर्च करावी लागली. हे सर्व काही दिलेला शब्द न पाळल्यामुळे घडले असल्याचे युवतीने म्हटले आहे.
तुम्ही अशाप्रकारे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुणावरही दबाव टाकू शकत नाही, विशेषकरून नाते कायदेशीर स्वरुपात बंधनकारक नसल्यास हे शक्य नसल्याचे न्यायालयाने याप्रकरणी निर्णय देत म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी फ्लाइट चुकल्याने बॉयफ्रेंड विरोधात खटला
फ्लाइट चुकल्याने बॉयफ्रेंड विरोधात खटला
दिलेला शब्द पूर्ण न केल्याची प्रेयसीची तक्रार कुठलेही नाते टिकविण्यासाठी स्वत: दिलेले शब्द पूर्ण करणे प्रत्येकालाच शक्य नसते. विशेषकरून जेव्हा केवळ तोंडी आश्वासने पूर्ण होत नाहीत तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला अत्यंत वाईट वाटू शकते. यामुळे भांडण होण्यास वेळ लागत नाही. काही असाच प्रकार एका युवतीसोबत घडला आहे. न्यूझीलंडच्या महिलेने या भांडणाला पुढे नेत स्वत:च्या प्रियकराच्या विरोधात […]