थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

साहित्य- गव्हाचे पीठ – 200 ग्रॅम मीठ – १/२ चमचा तेल – 1 चमचा पाणी किसलेले गाजर दालचिनी पूड – 1/4 चमचा

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

साहित्य- 

गव्हाचे पीठ – 200 ग्रॅम

मीठ – 1/2 चमचा 

तेल – 1 चमचा 

पाणी  

किसलेले गाजर 

दालचिनी पूड – 1/4 चमचा 

गूळ – 50 ग्रॅम

देसी तूप  

 

कृती-

सर्वात आधी एका परातीमध्ये गव्हाचे मीठ, तेल आणि पाणी एकत्र करून मऊ पीठ मळून घ्यावे. व 30 मिनिटे बाजूला ठेऊन द्यावे. आता एका पॅनमध्ये किसलेले गाजर घालून मंद आचेवर 7-8 मिनिटे शिजवून घ्यावे. गाजर शिजल्यावर एका भांड्यात काढून घ्यावे. आता दालचिनी पूड, गूळ घालून चांगले मिक्स करावे. तसेच पिठाचा एक गोळा घ्यावा. व पोळी लाटून घ्यावी. त्यामध्ये हे गाजराचे मिश्रण पसरावे. त्यावर दुसरी पोळी ठेवावी. व हालकसे लाटून घ्यावे. आता तयार पराठा तव्यावर तूप लावून शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपले गाजराचे पराठे, गरम नक्कीच सर्व्ह करू शकतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik