कॅरोलिन वोझनियाकी, पॅरी पराभूत
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात युक्रेनच्या अॅनिलिना कॅलिनिनाने माजी टॉप सिडेड कॅरोलिन वोझनियाकीला पराभवाचा धक्का देत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे हदाद माईयाने डायनी पॅरीचा तसेच टाऊनसेंडने एलीस मर्टेन्सचा पराभव केला. पुरुषांच्या विभागात जपानच्या निशीकोरीला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात कॅलिनिनाने वोझनियाकीचा 5-7, 7-5, 6-4 असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. वोझनियाकीने 2018 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर 2020 साली तिने टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. अलीकडेच झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत वोझनियाकीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. अन्य एका सामन्यात 11 व्या मानांकित हदाद माईयाने पॅरीचा 3-6, 6-1, 6-4 तसेच टाऊनसेंडने एलीस मर्टेन्सचा 6-2, 6-2, अॅना कॅलिनस्केयाने वेंग झियूचा 6-2, 6-2, 17 व्या मानांकित मॅडिसन किजने डायना स्नेडरचा 6-2, 6-4 असा पराभव केला.
पुरुषांच्या विभागात जपानच्या निशीकोरीचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. सेबेस्टीयन ऑफनेरने निशीकोरीचा 6-3, 6-4, तसेच कॅनडाच्या अॅलिसिमेने अॅडॅम वॉल्टनचा 7-5, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले
Home महत्वाची बातमी कॅरोलिन वोझनियाकी, पॅरी पराभूत
कॅरोलिन वोझनियाकी, पॅरी पराभूत
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा) एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या मियामी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात युक्रेनच्या अॅनिलिना कॅलिनिनाने माजी टॉप सिडेड कॅरोलिन वोझनियाकीला पराभवाचा धक्का देत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे हदाद माईयाने डायनी पॅरीचा तसेच टाऊनसेंडने एलीस मर्टेन्सचा पराभव केला. पुरुषांच्या विभागात जपानच्या निशीकोरीला पहिल्याच फेरीत हार पत्करावी […]
