कार्डिनल फिलिप फेर्रांव यांची आशिया परिषदेवर निवड

पणजी : एशियन कॅथोलिक बिशप्स परिषद महासंघाच्या अध्यक्षपदी गोवा व दमणचे मुख्य बिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांची निवड करण्यात आली आहे. कार्डिनल फेर्रांव सध्या कॅथोलिक बिशप ऑफ इंडियाच्या परिषदेचे अध्यक्ष आहेत. थायलँडची राजधानी बँकॉक येथे परिषदेच्या केंद्रीय समितीच्या तीन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी दि. 22 फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात आली. या बैठकीत बिशप […]

कार्डिनल फिलिप फेर्रांव यांची आशिया परिषदेवर निवड

पणजी : एशियन कॅथोलिक बिशप्स परिषद महासंघाच्या अध्यक्षपदी गोवा व दमणचे मुख्य बिशप कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांची निवड करण्यात आली आहे. कार्डिनल फेर्रांव सध्या कॅथोलिक बिशप ऑफ इंडियाच्या परिषदेचे अध्यक्ष आहेत. थायलँडची राजधानी बँकॉक येथे परिषदेच्या केंद्रीय समितीच्या तीन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी दि. 22 फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात आली. या बैठकीत बिशप पॉल व्हर्जिलियो सिओंगको डेव्हिड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते कार्डिनल माल्कम रणजीत यांच्यानंतर कोलंबो, श्रीलंकेचे मुख्य बिशप म्हणून काम पाहणार आहेत.