शॉर्टसर्किटने कारला आग
रामदेव हॉटेलजवळील घटना
बेळगाव : रामदेव हॉटेलकडून गँगवाडीकडे जाणाऱ्या धावत्या कारला शॉर्टसर्किटने सोमवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. धावत्या गाडीतून धूर येत असल्यामुळे चालक कारमधून बाहेर पडला. त्यानंतर बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आली. अकबर सय्यद हे सँट्रो कार क्र. एमएच 03, झेड 6699 मधून गँगवाडीकडे चालले होते. त्यावेळी अचानक कारमधून धूर येऊ लागला. त्यानंतर ते कारमधून बाहेर आले. अचानक पेट घेतल्यामुळे तेथे धावपळ उडाली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. तातडीने अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली.
Home महत्वाची बातमी शॉर्टसर्किटने कारला आग
शॉर्टसर्किटने कारला आग
रामदेव हॉटेलजवळील घटना बेळगाव : रामदेव हॉटेलकडून गँगवाडीकडे जाणाऱ्या धावत्या कारला शॉर्टसर्किटने सोमवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. धावत्या गाडीतून धूर येत असल्यामुळे चालक कारमधून बाहेर पडला. त्यानंतर बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आली. अकबर सय्यद हे सँट्रो कार क्र. एमएच 03, झेड 6699 मधून गँगवाडीकडे चालले […]