रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवलमूल्य 21 लाख कोटी पार
मुंबई :
भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने 21 लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल मूल्य साध्य करण्यात शुक्रवारी यश मिळविले आहे. यासोबतच शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमीटेडच्या समभागाने नवा विक्रमी स्तर गाठला होता.
रिलायन्सच्या जिओने आपल्या कॉलिंग दरामध्ये वाढ केली असून याचा परिणामदेखील समभागांवर शुक्रवारी पहायला मिळाला. दुपारी 2.30 वा. 3 टक्के वाढीसोबत कंपनीच्या समभागाच्या भावानी 3156 रुपयांचा स्तर पार केला होता. आघाडीवरच्या 10 मौल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज कंपनी ही सर्वाधिक भांडवलमूल्य असणारी कंपनी आहे. 21.03 लाख कोटी रुपये इतके बाजार भांडवलमूल्य कंपनीने शुक्रवारी नोंदविले होते.
जिओचे 400 दशलक्ष ग्राहक
रिलायन्स जिओ ही भारतामध्ये आघाडीवरची दूरसंचार सेवा देणारी कंपनी मानली जाते. 400 दशलक्ष इतके कंपनीचे ग्राहक आहेत. यानंतर भारती एअरटेलचा नंबर लागतो.
Home महत्वाची बातमी रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवलमूल्य 21 लाख कोटी पार
रिलायन्स इंडस्ट्रिजचे भांडवलमूल्य 21 लाख कोटी पार
मुंबई : भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने 21 लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल मूल्य साध्य करण्यात शुक्रवारी यश मिळविले आहे. यासोबतच शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमीटेडच्या समभागाने नवा विक्रमी स्तर गाठला होता. रिलायन्सच्या जिओने आपल्या कॉलिंग दरामध्ये वाढ केली असून याचा परिणामदेखील समभागांवर शुक्रवारी पहायला मिळाला. दुपारी 2.30 वा. 3 टक्के वाढीसोबत कंपनीच्या समभागाच्या भावानी 3156 रुपयांचा […]