कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमण करणाऱ्यांना इशारा
15 दिवसांची मुदत; अन्यथा उगारणार कारवाईचा बडगा : अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच खतपाणी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड अखत्यारित येणाऱ्या कॅम्प व किल्ला परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. खुल्या जागा तसेच रस्त्याशेजारी अतिक्रमण करत व्यवसाय थाटण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या सर्वांवर कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सीईओ राजीवकुमार यांनी दिला आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या क्षेत्रात अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही वर्षांत कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमण झालेल्या ठिकाणी कारवाई झाली नसल्याने खुल्या जागांवर राजरोसपणे व्यवसाय सुरू आहेत. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच खुल्या जागांवर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. काही ठिकाणी बोर्डकडून परवानगी न घेताच घरांचे बांधकाम वाढविण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणाला खतपाणी घातले जात होते. परंतु नवीन सीईओ राजीवकुमार यांनी पदभार स्वीकारताच अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड अॅक्शन मोडवर
यापूर्वीच्या सीईओंनी अतिक्रमणाबाबत धडक कारवाई केली नसल्याने बोर्डमध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर खुल्या जागांवर व्यवसाय सुरू आहेत. आता कॅन्टोन्मेंट बोर्डने अतिक्रमण, तसेच अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यास प्रारंभ केल्याने कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे. सध्या कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात कारवाई होते की हा केवळ फार्स ठरणार, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.
नागरिकांना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून नोटिसा…
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून नोटिसा दिल्या जात आहेत. खुल्या जागा, तसेच रस्त्याशेजारी अतिक्रमण केलेल्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही अतिक्रमण आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डकडून देण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमण करणाऱ्यांना इशारा
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून अतिक्रमण करणाऱ्यांना इशारा
15 दिवसांची मुदत; अन्यथा उगारणार कारवाईचा बडगा : अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच खतपाणी बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड अखत्यारित येणाऱ्या कॅम्प व किल्ला परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. खुल्या जागा तसेच रस्त्याशेजारी अतिक्रमण करत व्यवसाय थाटण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या सर्वांवर कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाई […]