खानापूर शहरात मतदान जागृतीसाठी कॅन्डल मार्चचे आयोजन

खानापूर : खानापूर शहरात बुधवारी सायंकाळी मतदान जागृतीसाठी शासनातर्फे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. येथील तहसीलदार कार्यालयातून या कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील स्टेशन रोड, महाजन खुट्ट, लक्ष्मी मंदिर, दुर्गानगरसह शहरातील विविध मार्गावरुन मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये खानापूर तालुका निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यल्लाप्पा […]

खानापूर शहरात मतदान जागृतीसाठी कॅन्डल मार्चचे आयोजन

खानापूर : खानापूर शहरात बुधवारी सायंकाळी मतदान जागृतीसाठी शासनातर्फे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. येथील तहसीलदार कार्यालयातून या कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील स्टेशन रोड, महाजन खुट्ट, लक्ष्मी मंदिर, दुर्गानगरसह शहरातील विविध मार्गावरुन मतदान करण्याबाबत जागृती करण्यात आली. या कॅन्डल मार्चमध्ये खानापूर तालुका निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यल्लाप्पा माविनकाई यासह इतर कृषी खात्याचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी, ता. पं. अधिकारी जहागीरदार, अंगणवाडी कर्मचारी यासह सर्व खात्याचे अधिकारी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. ध्वनिक्षेपकावरुन मतदान करण्याबाबत जागृती करण्यात येत होती. तसेच मतदान करण्याबाबत विविध घोषणांचे फलक धरण्यात आले हेते.