विदेशी नोंदणी रद्द केल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप मिळत नाही
आमदार अॅड. कार्लूस फ्sढरेरा यांचा पत्रकार परिषदेत दावा
पणजी : पोर्तुगालमधील जन्मनोंदणी रद्द केली म्हणून भारतीय नागरिकत्व पुन्हा आपोआप मिळू शकत नाही. त्यासाठी भारतात राहून पुन्हा अर्ज करण्याची गरज असते, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लूस फ्sढरेरा यांनी दिले आहे. पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुहेरी नागरिकत्वाबाबत बोलताना सांगितले, की दुसऱ्या देशाचे नागिरकत्व घेतले की भारतीय नागरिकत्व कायद्याने आपोआप संपुष्टात येते. तथापि अनेकजण पोर्तुगालमध्ये जाऊन जन्माची नोंदणी करतात. तेथे नोंदणी केली की त्या देशाचे नागरिकत्व मिळते ही वस्तुस्थिती आहे. परंतु तेथील नागरिकत्व मिळाले तरी भारतीय नागरिकत्व संपते हे अनेकांना माहित नाही. शिवाय तेथील जन्म नोंदणी रद्द केली म्हणजे भारतीय नागरिकत्व कायम राहते हे देखील चुकीचे असून याबाबत गैरसमज आहेत. म्हणून पोर्तुगालमध्ये नोंदणी केलेल्या गोमंतकीयांचे दुहेरी नागरिकत्व आहे, असा अनेकांचा समज आहे, परंतु तो चुकीचा असल्याचा दावा फ्sढरेरा यांनी केला आहे. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली म्हणजे तेथील नागरिकत्व मिळत नाही, असे तत्कालीन एनआरआय आयुक्त विल्फ्sdरड मिस्किता यांनी केंद्राला लिहिलेले पत्र चुकीचे होते आणि त्याचा चुकीचा अर्थ लोकांनी घेतला असा खुलासा फ्ढरेरा यांनी केला आहे.
Home महत्वाची बातमी विदेशी नोंदणी रद्द केल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप मिळत नाही
विदेशी नोंदणी रद्द केल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप मिळत नाही
आमदार अॅड. कार्लूस फ्sढरेरा यांचा पत्रकार परिषदेत दावा पणजी : पोर्तुगालमधील जन्मनोंदणी रद्द केली म्हणून भारतीय नागरिकत्व पुन्हा आपोआप मिळू शकत नाही. त्यासाठी भारतात राहून पुन्हा अर्ज करण्याची गरज असते, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लूस फ्sढरेरा यांनी दिले आहे. पणजीत काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुहेरी नागरिकत्वाबाबत बोलताना सांगितले, की दुसऱ्या देशाचे नागिरकत्व […]