विनाहेल्मेट चालकांचा परवाना रद्द करा : पोलीस आयुक्तांचा आदेश
जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठक : अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण घटविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची सूचना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरील सूचना केली आहे.विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांचे लायसेन्स रद्द करण्याचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. शहरातील काही प्रमुख ठिकाणी प्रिपेड ऑटोरिक्षा व्यवस्था सुरू करावी. फुटपाथवर व्यापार करणाऱ्यांकडून महानगरपालिका कर वसूल करते आहे. त्यामुळे त्यांना हटविणे कठीण जात आहे. याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. देशभरात अपघात घटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी अशा बैठकांना उपस्थित राहणे सक्तीचे असून आपल्यावर दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी, असे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
सतरा ब्लॅकस्पॉट निश्चित
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सतरा ब्लॅकस्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते व इतर संबंधित खात्यांनी पाहणी करून आवश्यक उपाययोजना करावी. महामार्ग किंवा जिल्हा मुख्य रस्त्यांना, अॅप्रोच रस्त्यांना पथदीपांची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व इतर वाहनांना सक्तीने रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची सूचनाही पोलीसप्रमुखांनी केली. शहरातील काही भागात खासगी बसेस उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. याबरोबरच फुटपाथवर अतिक्रमण सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते अरुणकुमार पाटील यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ब्लॅकस्पॉटवर सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा म्हणाल्या, शहरातील प्रमुख चौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग व इतर वाहतूक चिन्हांचे मार्किंग करण्याची गरज आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते एस. बी. सोबरद, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, परिवहन खात्याचे डीटीओ लमाणी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नागेश मुंडास, माहिती खात्याचे अधिकारी गुरुनाथ कडबूर यांच्यासह वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी विनाहेल्मेट चालकांचा परवाना रद्द करा : पोलीस आयुक्तांचा आदेश
विनाहेल्मेट चालकांचा परवाना रद्द करा : पोलीस आयुक्तांचा आदेश
जिल्हा रस्ते सुरक्षा समिती बैठक : अपघात टाळण्यासाठी उपाययोजना बेळगाव : बेळगाव शहर व जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण घटविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची सूचना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी वरील सूचना केली आहे.विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांचे लायसेन्स रद्द करण्याचा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना […]