कॅनडाची चिलीवर मात, अमेरिका विजयी
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू झालेल्या युनायटेड चषक आंतरराष्ट्रीय सांघिक टेनिस स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सलामीच्या लढतीत कॅनडाने चिलीचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. कॅनडाच्या लैला फर्नांडीसने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
या लढतीतील एकेरीच्या पहिल्या सामन्यात फर्नांडीसने चिलीच्या सेग्युएलचा 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केल्या. त्यानंतर निकोलास जेरेनी कॅनडाच्या डाएजवर मात करून चिलीला बरोबरी साधून दिली. दरम्यान मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात कॅनडाच्या लैला फर्नांडीस आणि डाएज याने चिलीच्या व्हेरा आणि सेग्युएल यांचा 7-5, 4-6, 10-8 असा पराभव केला.
पर्थमध्ये या स्पर्धेतील अन्य एका लढतीत अमेरिकेने निर्णायक सामना जिंकला. ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील या लढतीमध्ये क गटात ब्रिटनच्या केटी बोल्टरने अमेरिकेच्या पेगुलाचा 5-7, 6-4, 6-4 असा पराभव केला. हा सामना तीनतास चालला होता. त्यानंतर दुसऱ्या एकेरी सामन्यात टेलर फ्रिजने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत अमेरिकेला बरोबरी साधून दिली. मिश्र दुहेरीच्या निर्णायक सामन्यात अमेरिकेच्या पेगुला आणि फ्रिज यानी ब्रिटनच्या बोल्टर व स्कुपेस्की यांचा 1-6, 7-6 (7-4), 10-7 असा पराभव केला. अमेरिकेने या लढतीत ब्रिटनवर 2-1 असा विजय मिळविला. या स्पर्धेत ई गटात चीनने झेक प्रजासत्ताकचा 3-0 असा पराभव केला.
Home महत्वाची बातमी कॅनडाची चिलीवर मात, अमेरिका विजयी
कॅनडाची चिलीवर मात, अमेरिका विजयी
वृत्तसंस्था/ सिडनी येथे सुरू झालेल्या युनायटेड चषक आंतरराष्ट्रीय सांघिक टेनिस स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सलामीच्या लढतीत कॅनडाने चिलीचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. कॅनडाच्या लैला फर्नांडीसने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या लढतीतील एकेरीच्या पहिल्या सामन्यात फर्नांडीसने चिलीच्या सेग्युएलचा 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केल्या. त्यानंतर निकोलास जेरेनी कॅनडाच्या डाएजवर मात करून […]