‘आयपीएस’ना केंद्राकडून सेवेसाठी बोलावणे

राज्यातील 28 अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा पोलीसप्रमुखांचाही समावेश बेळगाव : कर्नाटकातील 28 आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय सेवेसाठी बोलावणे आले आहे. केंद्रीय गृह खात्याने यासंबंधीची सूचना केली असून बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांचाही यामध्ये समावेश आहे. डॉ. गुळेद हे 9 सप्टेंबर 2023 पासून बेळगावात कार्यरत आहेत. केंद्र सरकारने बोलावलेल्या कर्नाटक केडरच्या 28 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश असून […]

‘आयपीएस’ना केंद्राकडून सेवेसाठी बोलावणे

राज्यातील 28 अधिकाऱ्यांमध्ये जिल्हा पोलीसप्रमुखांचाही समावेश
बेळगाव : कर्नाटकातील 28 आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय सेवेसाठी बोलावणे आले आहे. केंद्रीय गृह खात्याने यासंबंधीची सूचना केली असून बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांचाही यामध्ये समावेश आहे. डॉ. गुळेद हे 9 सप्टेंबर 2023 पासून बेळगावात कार्यरत आहेत. केंद्र सरकारने बोलावलेल्या कर्नाटक केडरच्या 28 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचाही समावेश असून यापैकी अनेक अधिकाऱ्यांना केंद्रीय सेवेत रुजू होण्यात स्वारस्य नाही. निमित्त गोयल, बी. एम. लक्ष्मीप्रसाद, प्रकाश निकम, इलाकेया करुणाकरन, राहुल कुमार, धर्मेंद्रकुमार मीणा यांच्यासह 28 जणांना केंद्राकडून बोलावणे आले आहे. कर्नाटकात सध्या 215 आयपीएस पदे आहेत. यापैकी 150 थेट भारतीय पोलीस सेवेतून नियुक्त झालेले आहेत. 65 जण केएसपीएसहून आयपीएसला बढती झालेले आहेत. 215 पैकी 40 टक्के अधिकारी केंद्रीय सेवेसाठी जुंपावे लागणार आहेत. तसा नियमही आहे. मात्र, केंद्रीय सेवेत कर्नाटक केडरचे सध्या केवळ 14 अधिकारी कार्यरत आहेत.